नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी ऑईल ऍण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) या कंपनीची देशातील तेल आणि गॅस उत्पादनांमध्ये हिस्सेदारी वाढून 70 टक्क्यांवर पोहोचली आहे. ही स्थिती मागील एक देशकाच्या अगोदर 53 टक्क्यांवर होती. एका बाजूला ओएनजीसीचा उत्पादन स्तरावर कायम राहिला आहे. तसेच अन्य प्रकल्पाच्या उत्पादनांमध्ये घसरण आलेली असल्याने देशातील तेल ऍण्ड गॅस उत्पादनांमध्ये एकूण स्थिती पाहता घसरण राहिली आहे. ज्यामध्ये काही भाग हा आयातीवर निर्भरत वाढीस लागली आहे. आर्थिक वर्ष 2010-11 मध्ये ओएनजीसीचे तेल आणि तेल समतुल्य गॅस उत्पादन हे 4.75 कोटी टन राहिले जे देशातील एकूण 8.99 कोटी टन उत्पादनाच्या 52.8 टक्क्यांवर असल्याची माहिती आहे. 2019-20 मध्ये ओएनजीसीचे उत्पादन 4.45 कोटी टनावर राहिली होती. जी देशाच्या एकूण 6.33 कोटी टनाच्या उत्पादनाचा 70.03 टक्क्याचा भाग राहिला आहे.