बजाज चेतकला मिळाली 465 टक्क्यांची तेजी- ग्राहकांची वाढती पसंती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होत असल्याचे पहावयास मिळाले आहे. ऑफिस आणि दैनंदिन वापरासाठी आता ई-स्कूटरला लोकांची पसंती मिळाल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडत असल्यामुळे ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहन विकत घेण्यावर जोर दिला आहे.
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरने या दरम्यान विक्रीचा नवीन विक्रम नोंदवला आहे. प्राप्त अहवालानुसार ई-स्कूटरने विक्रीमध्ये महिन्याच्या आधारे 464.44 टक्क्यांनी वाढ दर्शवली आहे. मार्च महिन्याच्या दरम्यान चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची 90 युनिटची विक्री झाली आहे. एप्रिलच्या आकडेवारीनुसार विक्री 508 युनिट झाली आहे. येणाऱया काळातही विक्रीवर भर दिला जाईल.
बजाज चेतकच्या नवीन किमती (रुपयात)
मॉडेल जुनी किमत नवी किमत
प्रीमियम ……………. 1.20 लाख 1.45 लाख
अर्बन….. 1.15 लाख.. 1.43 लाख
विविध ऍडव्हान्स फिचर्स
? स्कूटरमध्ये ऑल-एलईडी लाइट्स, प्रंट डिस्क ब्रेक आणि डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टरसह रीजनरेटिव्ह बेकिंगची सुविधा मिळणार
? 12 इंचाचे अलॉय व्हील मिळणार आहेत.
? पुढील बाजूला 90/90 टायर आणि मागच्या बाजूला 90/100 टायर दोन्ही टय़ूबलेस मिळणार आहेत.