ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा रुग्ण संख्या कमी होताना दिसत असली तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दररोज समोर येणारा आकडा भयावह आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतात मागील 24 तासात 39 हजार 796 नवे रुग्ण आढळून आले. तर 723 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 05 लाख 85 हजार 229 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4,02,728 जणांनी आपला जीव गमावला आहे.
बुधवारी देशात 42 हजार 352 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 00 हजार 430 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 4 लाख 82 हजार 071 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 14 लाख 81 हजार 583 लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील 35 कोटी 28 लाख 92 हजार 046 जणांना लस देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशात 41 कोटी 97 लाख 77 हजार 457 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 15 लाख 22 हजार 504 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 4 जुलै 2021) एका दिवसात करण्यात आल्या.