ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 14 हजार 256 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 156 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 06 लाख 39 हजार 684 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 53 हजार 184 एवढी आहे.
शुक्रवारी 17,230 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 03 लाख 838 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 85 हजार 662 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 19 कोटी 09 लाख 85 हजार 119 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 37 हजार 095 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.22) करण्यात आल्या.