ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 2 लाख 59 हजार 591 नव्या बाधितांची नोंद झाली. तर 3 लाख 57 हजार 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले. गुरुवारी 4206 रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 2 लाख 91 हजार 331 एवढी आहे. आतापर्यंत 2 कोटी 27 लाख 12 हजार 735 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 30 लाख 27 हजार 926 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 19 कोटी 18 लाख 79 हजार 503 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.