बेळगाव / प्रतिनिधी
येथील नामवंत दैवज्ञ सहकार बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत बँकेच्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी सत्ता कायम राखली. यावेळी 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलचे 8 उमेदवार विजयी झाले. तर रघुनाथ शेजेखान यांनीही विजय मिळविला. तर अनुसूचित जातीमधून ज्योतिर्लिंग जाधव, इतर मागासमध्ये जीवन दत्तात्रय वेर्णेकर आणि महिलांमध्ये (राखीव) कल्पना दिनकर अणवेकर, विनिता विश्वास शेठ या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
रविवारी सराफ गल्ली शहापूर येथील दैवज्ञ सहकार बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- अरुण नागेश रायकर- (288 मते), उदय गणपती रायकर- (306), उदयशंकर नागेश भट (295), गजानन (माणिक) अणवेकर (308), गणेश रमाकांत वेर्णेकर (343), मंजुनाथ शंकर शेठ (301), राजेश रमाकांत अणवेकर (312), सदानंद महाबळेश्वर रेवणकर (244), रघुनाथ शेजेखान (263). निवडणूक अधिकारी म्हणून रेष्मा मकानदार यांनी काम पाहिले.
सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मत मोजणीला सुरुवात झाली. सायंकाळी 6.45 च्या सुमारास निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आणि फटाके वाजवून आनंद साजरा केला.