बोटांमुळे जगभरात मिळाली प्रसिद्धी
सर्वसाधारणपणे सुंदर युवतींना पाहून अनेक लोक हरवून जात असतात. काहीसे असे घडते एका मॉडेलसोबत. सुंदर चेहरा असणाऱ्या या युवतीची एक अजब गोष्ट सहजपणे लोकांच्या लक्षात येत नाही. 25 वर्षीया या मॉडेलने सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर स्वत:चे अकौंट तयार केले आहे. लोक तिच्या सौंदर्याचे पाहण्याच्या नादात तिच्या हातांमध्ये काहीतरी खास आहे हे समजून घेण्यास विसरतात.
पॉलिडॅक्टील66 नावाने तिचे इन्स्टाग्राम अकौंट असून तिचे युजरनेमच तिच्या वैशिष्ट्याबद्दल सांगण्याचे पुरेसे आहे. या युवतीच्या दोन्ही हातांमध्ये 5 ऐवजी प्रत्येकी 6 बोटं आहेत. याचमुळे तिने स्वत:चे युजरनेम पॉलिडॅक्टील ठेवले आहे. कारण अशाप्रकारच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत पॉलिडॅक्टील म्हटले जाते. यात हातांमध्ये पाचऐवजी 6 बोटं असतात.
ही युवती स्वत:च्या वैशिष्ट्याला मोठ्या प्रमाणात फ्लॉन्ट देखील करते. तिने टिकटॉकवर बोटांवरून व्हिडिओ देखील तयार केला आहे. लोक तिच्या व्हिडिओंना मोठी पसंती देतात. तिच्या दोन्ही हातांमध्ये प्रत्येकी 6 बोटं पाहून लोक अचंबित होतात.