वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे भारतीय महिला मुष्टीयोद्धय़ासाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरातील दोन साहाय्यक प्रशिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्धय़ांसाठी सराव शिबीर सुरू आहे. या शिबिरावेळी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत दोन महिला प्रशिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान हे सराव शिबीर यापुढेही चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले. पतियाळामध्ये भारताच्या पुरूष मुष्टीयोद्धय़ासाठी सुरू असलेल्या सराव शिबिरातील राष्ट्रीय प्रमुख प्रशिक्षक सी.के. कुटाप्पा यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर या शिबिरातील आणखी दोन प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. पतियाळातील या शिबिरामध्ये 10 सदस्यांचा समावेश आहे. 21 ते 31 मे दरम्यान नवी दिल्लीत होणाऱया आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे मुष्टीयोद्धे सहभागी होणार आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रसारामध्ये रविवारी 10,000 नवे रूग्ण आढळले आहेत.