आज होणार अधिकारग्रहण
प्रतिनिधी / बेळगाव
द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेकच्या अध्यक्षपदी कुलदीप यशवंत हंगिरगेकर यांची निवड करण्यात आली आहे. सेपेटरीपदी डॉ. रूपाली काविलकर आणि खजिनदारपदी अश्विनकुमार कलमनी यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार दि. 27 रोजी सायं. 6 वाजता ते अधिकारग्रहण करणार आहेत.
हॉटेल मॅरिएट येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त जगदीश के. एच., बसवराज हिरेमठ, एम. व्ही. हिरेमठ उपस्थित राहणारआहेत.