केएससीए सचिव संतोष मेनन यांच्याकडून संघाचा सत्कार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित 25 वर्षाखालील एसए श्रीनिवासन स्मृती चषक आंतरविभागिय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धारवाड विभागीय संघाने स्पर्धेत 5 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले. तब्बल 25 वर्षानंतर त्यांनी हे यश मिळविले. बलाढय़ बेंगळूर प्रेसिडेंट संघाला 8 गुणासह दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. अव्वल स्थानावर असल्यामुळे या संघाला मानाचा एस.ए. श्रीनिवासन चषक देण्यात आला. त्याबद्दल केएससीएचे सचिव संतोष मेनन यांच्या हस्ते या संघाचा हुबळी येथे खास सत्कार करण्यात आला.
या आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत 12 विभागिय संघांचा समावेश होता. त्यामध्ये 6 झोन संघाचा तर 6 मोफेशियल संघांचा समावेश होता. या स्पर्धेत धारवाड विभागीय संघाने सातत्याने सर्व संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. या संघाने 5 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवून गुणतालिकेत 10 गुणांसह अव्वल स्थान पटकाविले. शेवटच्या साखळी सामन्यात धारवाड विभागीय संघाने बेंगळूर प्रेसिडेंट संघाचा पराभव करून या स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब करीत तब्बल 25 वर्षानंतर एस. ए. श्रीनिवासन चषकावर आपले नाव कोरले.
या विजयानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सचिव संतोष मेनन हे धारवाड विभागीय क्रिकेट संघटना संघाच्या सत्कार समारंभास उपस्थित होते. यावेळी धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार, धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे चेअरमन विरण्णा सौदी, कोटा सुंदरम आदी मान्यवरांच्या हस्ते कर्णधार स्वप्निल एळवे, परिक्षित उकुंडी, सुधन्वा कुलकर्णी, विठ्ठल हबिब, राहुल वेर्णेकर, वैष्णव संघमित्र, विरेंद्र सब्रानी, लिखित बण्णूर, रोहितकुमार ए. सी., रोहित पाटील, अमर घाळी, मुदस्सर नझर, सोमशेखर नवलगीमठ, आकाश कटांबळे, इन्दसेन दानी तर प्रशिक्षक अरमोगम, व निवड समितीचे सदस्य प्रमोद कामत यांच्यासह खेळाडूंचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.