- आतापर्यंत 11,006 कोरोनामुळे मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 1,881 नव्या कोरोना रुग्ण आढळून आले. तर 09 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 57 हजार 715 वर पोहचली आहे. यामधील 7,545 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 952 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 39 हजार 164 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11,006 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 44 लाख 03 हजार 030 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 53,422 आरटीपीसीआर टेस्ट आणि 26,514 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.