प्रतिनिधी/ बेळगाव
नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटी येळ्ळूर (आंतरराज्य) या संस्थेच्या चेअरमनपदी उदय शंकर जाधव यांची तर व्हा. चेअरमन म्हणून संभाजी कृष्णा कणबरकर यांची 2020-2023 सालासाठी फेरनिवड करण्यात आली आहे.
यावेळी संस्थेच्या सभागृहात चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी कार्याचा आढावा घेतला. नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी बी. सायनेकर, संचालक प्रकाश अष्टेकर, एल. आय. पाटील यांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक प्रदीप एस. मुरकुटे, सी. बी. पाटील, अनिल एच. हुंदरे, भीमराव पुण्यणावर, संचालिका स्नेहलता चौगुले, नीता जाधव, नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन वाय. सी. गोरल, व्हा. चेअरमन डी. एन. पाटील, संस्थापक सदस्य नारायण जाधव, आनंद मजुकर, वाय. एन. पाटील, वसुली अधिकारी जे. एस. नांदुरकर, शाखा अधिकारी दिनेश पाटील, एचओ इन्चार्ज विवेक मोहिते, तपासणी अधिकारी एस. जी. अधिकारी हे उपस्थित होते. संस्थेचे साहाय्यक जनरल मॅनेजर एन. डी. वेर्णेकर यांनी आभार मानले.