1 हजार एकर इतका मोठा आकार
दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या जन्मदिनानिमित्त 1 हजार एकरचे जंगल दत्तक घेतले आहे. यासंबंधीची माहिती त्याने सोशल मीडियावरून शेअर केली आहे.
मुख्यमंत्र्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा. चेंगीचेर्ला जंगलक्षेत्रातील एएनआर अर्बन पार्क हे अक्कीनेनी कुटुंबाने दत्तक घेतल्याचे नागार्जुनने म्हटले आहे. अक्किनेनी कुटुंबाने जंगलाच्या विकासाकरता 2 कोटी रुपयांची देणगी देखील दिली आहे. जंगलक्षेत्र दत्तक घेण्याच्या एका समारंभादरम्यान नागार्जुन यांच्यासह त्यांची पत्नी अमला, पुत्र नागा चैतन्य आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. नागार्जुन यांचे वडिल अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या सन्मानार्थ वनक्षेत्राला शहरी वन पार्कात रुपांतरित केले जणार आहे. सोशल मीडियावर नागार्जुन यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. डिसेंबर महिन्यात नागार्जुन यांनी जंगलक्षेत्र दत्तक घेण्याची घोषणा केली होती.
जंगलक्षेत्राची देखभाल आता नागार्जुन आणि त्यांची स्वयंसेवी संस्था करणार आहे. नागार्जुन हे पत्नी अमलासोबत मिळून हैदराबादमध्ये ‘ब्लू क्रॉस’ नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात.