वार्ताहर /लाटंबार्से
नानोडा येथील श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण देवीचा कालोत्सव आज सोमवार 6 रोजी विविध धार्मिक विधींसह साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी 9 वाजल्यापासून ओटी भरण्याच कार्यक्रम होईल. दुपारी महानैवेद्य, महाप्रसाद होऊन रात्री 12 वाजता श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. तद्नंतर मामा मोचेमाडकर दशावतारी नाटय़मंडळाचा नाटय़प्रयोग होऊन पहाटे गौळण काल्याने उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी तीर्थप्रसाद व नाटय़प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे देवस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे.