साहित्य : दीड वाटी बेसन, दीड चमचा रवा, 4 चमचे साखर, 1 चमचा आलं-हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ, 3 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ, चिमुटभर हिंग, 2 ते 3 कढीपत्ता पाने, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, सजावटीसाठी 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात रवा, साखर, आलं-हिरवी मिरची पेस्ट, लिंबूरस आणि मीठ घालून मिक्स करावे. त्यात पाऊण वाटी पाणी घालून पातळ मिश्रण बनवावे. मिश्रण वाफवण्याआधी त्यात चिमुटभर खाण्याचा सोडा मिक्स करावा. आता तयार मिश्रण 10 ते 12 मिनिटे मंद आचेवर ठेवून वाफवून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकून तडतडावी. नंतर तीळ, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून मिश्रण मिनिटभर परतवावे. तयार फोडणी व कोथिंबीर वाफवलेल्या ढोकळय़ावर पसरवावे. नंतर त्याच्या हव्या त्या आकारात वडय़ा पाडाव्यात. तयार नायलॉन ढोकळा ग्रीन चटणीसोबत खाण्यास द्या.