मुंबई
भारतीय शेअर बाजार सध्या जोमात दिसतो आहे. हे पाहता डिसेंबर 2021 पर्यंत निफ्टीचा निर्देशांक 15 हजारावर पोहचू शकतो, असा अंदाज ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन यांनी व्यक्त केला आहे. मार्चमध्ये बाजार तळाशी होता पण नंतर मात्र बाजाराने 80 टक्क्यांवर प्रगती साधली आहे. 2020 मध्ये आतापर्यंतच्या कालावधीत 11 टक्के इतक्या तेजीत बाजार दिसला आहे. जेपी मॉर्गनच्या मते राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 15 हजाराची पातळी 2021 च्या अखेरपर्यंत गाठू शकतो. सध्याची स्थिती पाहता हा टप्पा गाठणं निफ्टीला कठीण नाही.