प्रतिनिधी/ पणजी
सरकारने आजपासून कर्फ्यू जारी केला असून जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांनी सांगितले आहे. वाढत्या कोरोना महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ सरकारच उपायोजना करेल हा चुकीचा समज असून जनतेनेही सहकार्य करणे जरूरीचे आहे. लोकांनी नियमित मास्कचा वापर करावा, असे आवाहनही पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे.
शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महासंचाल मुकेशकुमार मिणा यांनी वरील माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत अधीक्षक शोबीत सक्सेना व महेश गावकर उपस्थित होते. नियमांचे उल्लंघन करणाऱयावर धडक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. दोन्ही जिह्यातील पोलीस तसेच आयआरबी पोलीस व वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही मुकेश कुमार मिणा यांनी दिली आहे. इतर राज्यातून गोव्यात येणाऱया पर्यटकांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे असले तरी शेजारी राज्यातून दर दिवशी कामानिमित्त गोव्यात येणाऱयांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे नसल्याचे पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.
बनावट मॅसेज व्हायरल करणाऱयांवरही कारवाई होणार
नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर आपद्कालीन व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई करण्यात येणार असल्याचे मुकेश कुमार मिणा यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या महासंकट विरोधात काम करणाऱया सरकारी अधिकाऱयांना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱया विरोधातही कडक कारवाई करण्यात येईल. कोविड काळात बनावट मॅसेज व्हायरल करण्याचे प्रकरण वाढले आहे. अशा लोकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.
मास्क न वापरलेल्यांवर कारवाई
कोविड काळात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱया विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरु करण्यास सुरु केली आहे. गेल्या महिन्याभरात 45 हजार 753 लोकांच्या विरोधात मास्क न वापरल्याने कारवाई केली आहे. तब्बल 92 लाख 86 हजार 300 रुपये इतका निधी जमा केला आहे. 719 लोकांवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयावर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे तसेच गुटखा खाणाऱया 169 लोकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.