ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना एकाच वेळी फाशी द्यायची की, वेगवेगळी याबाबतचा निर्णय आज उच्च न्यायालयात होणार आहे.
दिल्लीतील एका कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी होईपर्यंत चारही आरोपींच्या फाशीला स्थगिती दिली होती. त्यानंतर याला केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ज्यांचे कायदेशीर पर्यास संपले आहेत, अशा आरोपींना फाशीवर लटकवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाकडे केली होती.
या गुह्यातील आरोपींना एकच शिक्षा व्हावी आणि ती एकाच वेळी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या विशेष सुनावणीत दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. तो निकाल आज न्यायालय देणार आहे. या आरोपींना एकाच वेळी फाशी द्यावी, की वेगवेगळी हा निर्णय आज होणार आहे.