जिल्हाधिकाऱयांचा कर्मचाऱयांना इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कर्मचाऱयांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणासाठी अनेकांनी हजेरी लावली आहे, तर अनेकांनी अनुपस्थिती दर्शविली आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी दिला आहे.
लोकसभा पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होत आहे. त्या निमित्ताने सर्वांना प्रशिक्षणासाठी आदेश पाठविण्यात आले होते. मात्र, बरेच जण या प्रशिक्षणासाठी आलेच नाहीत. यदाकदाचित निवडणुकीच्या वेळेला कोणतीही चूक झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांवर आम्ही कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणाचा कार्यक्रम अजूनही सुरू असून प्रत्येकाने त्या कार्यक्रमाला हजर राहावे. जे कोणी याला उपस्थिती दर्शविणार नाहीत त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.