नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने रविवारी ‘मोमेंट्स विथ तिरंगा’ मोहिमेंतर्गत ट्विटरवर भारतीय राष्ट्रध्वजाचा रंग बनवणाऱया नैसर्गिक देखाव्याचे छायाचित्र शेअर केले. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सदर छायाचित्र जारी करण्यात आले आहे. संजीव कुमार सिंग यांनी दिलेल्या छायाचित्रासह ‘निसर्ग तिरंगा फडकवत आहे…’, अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. या फोटोवर अनेक वापरकर्त्यांनी री-ट्विट करत ‘झंडा ऊँचा रहे हमारा…’ अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पुढील महिन्यात होणाऱया ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारकडून वेगवेगळे उपक्रम हाती घेत सोहळापूर्व जनजागृती केली जात आहे.