गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असल्याने शहरात मेडिकल वेस्ट पडून असल्याचा पत्रात उल्लेख : प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर
प्रतिनिधी / सातारा
शहरातील असलेल्या सुमारे 30 हॉस्पिटलमधून तयार होणारे मेडिकल वेस्ट हे नष्ट करण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे केंद्र हे सोनगाव कचरा डेपोलगत असलेल्या नेचर नीड या संस्थेत आहे. परंतु अलिकडच्या काही दिवसांपासून हे केंद्र बंद असल्याने हॉस्पिटल व मेडिकल लॅब परिसरात कचरा पडून असल्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले होते. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने आज नेचर नीड बाबत पत्र महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळास दिले आहे. प्रदुषण नियंत्रण महामंडळाने यापूर्वीच एक आलेली तक्रार शासनाकडे पाठवली आहे. त्यामुळे नेचर नीड या संस्थेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
शहरातल्या हॉस्पिटलमध्ये दररोज तयार होणारे मेडिकल वेस्ट हे नष्ट करण्याचे आणि त्या वेस्ट गोळा करुन त्यावर प्रक्रिया करुन नष्ट करण्याचे काम पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोलगत असलेल्या नेचर ऍण्ड नीड या संस्थेत केले जाते. हॉस्पिटलमधील कचरा, मेडकलमधील कचरा गोळा करुन तेथे नेला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून ही संस्थाच हा कचरा नेत नाही. त्यामुळे हॉस्पिटलचा कचरा तसाच पडून आहे. अगोदरच कोरोनामुळे सगळीकडे भितीचे वातावरण आहे. त्यामुळे शहरातील हॉस्पिटलमध्ये कचरा हा तसाच राहिल्याने पुन्हा आजाराची भिती व्यक्त होवू लागली. यामुळे तो मेडिकल वेस्ट नेचर ऍण्ड नीड या संस्थेकडून कोरोनाच्या अगोदर बायोमेडिकल वेस्टवर प्रक्रिया केली जात होती. गोळा केला जात होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून ही प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाने आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास खरमरीत पत्र लिहिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास यापूर्वी एक तक्रार आल्याने त्याचीही कार्यवाही सध्या सुरु असून त्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवल्याचे प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडून सांगण्यात आले.