वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
न्यूझीलंड दौऱयासाठी पाक संघाची निवड करताना अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकला वगळण्यात आले. दरम्यान या दौऱयासाठी आपल्याला कोणत्या कारणासाठी निवडले गेले नाही, याची मला निश्चित कल्पना नाही. दरम्यान निवड सदस्यांची कोणताही संपर्क आला नसल्याचे स्पष्टीकरण शोएब मलिकने दिले आहे.
न्यूझीलंड दौऱयासाठी संयुक्त संघ निवडण्याची घोषणा पाक क्रिकेट मंडळाने गेल्या महिन्यात केली होती. पीसीबीने या दौऱयासाठी 35 जणांचा संघ निवडला असून टी-20 प्रकारात खेळणाऱया शोएब मलिकला मात्र निवड समितीने वगळले आहे. पाकच्या राष्ट्रीय संघात मला स्थान कोणत्या कारणास्तव दिले नाही याचे उत्तर केवळ निवड समिती प्रमुख देवू शकेल, असे शोएब मलिकने म्हटले आहे. निवड समिती सदस्यांनी माझ्याशी या संदर्भात कोणताच संपर्क साधलेला नाही, असे स्पष्टीकरण मलिकने वृत्तसंस्थेशी बोलताना दिले.
शोएब मलिक सध्या लंका प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत जाफना स्टॅलियन्स संघाकडून खेळत आहे. न्यूझीलंड दौऱयासाठी माझी राष्ट्रीय संघात निवड झाली नाही म्हणून मला निराश होण्याचे काहीच कारण वाटत नाही. तथापि मी माझ्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत पुरेसे क्रिकेट खेळलो आहे, असेही 38 वर्षीय शोएब मलिकने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शोएब मलिकने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 35 कसोटी, 287 वनडे आणि 116 टी-20 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त होण्याचा आपला सध्यातरी विचार नसल्याचे शोएबने म्हटले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात बाबर आझमकडे संघाचे नेतृत्व देण्याचा पीसीबीचा निर्णय धाडसी असल्याचे मत अष्टपैलू शोएब मलिकने व्यक्त केले.