वृत्तसंस्था / दोहा
आघाडीचा क्लुईस्ट पंकज अडवाणीने राष्ट्रीय सहकारी ध्रुव सितवालाला 6 प्रेम्सनी हरवत कारकिर्दीत आठव्यांदा आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम गाजवला. अडवाणीसाठी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील 24 वे विजेतेपद आहे.
दोनवेळचा आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियन ध्रुवविरुद्ध अडवाणीने पहिला प्रेम अगदी सहज जिंकला आणि सहज सेंच्युरी ब्रेकसह 2-0 अशी आघाडी प्राप्त केली. तिसऱया प्रेममध्येही पंकजने 84-14 अशी एकतर्फी आघाडी मिळवली आणि त्यानंतर आणखी 3 प्रेम सलग जिंकत विजयाच्या दिशेने जोरदार आगेकूच केली. सितवालाने नंतर 82 च्या ब्रेकसह तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला. पण, अडवाणीने पाचवी प्रेम जिंकत आपली आघाडी 4-1 अशी आणखी भक्कम केली आणि सहाव्या पेममध्येही सहज मुसंडी मारली. सितवालाने सातवी प्रेम जिंकली असली तरी आठव्या प्रेममध्ये अडवाणीने 6-2 असा विजय मिळवला.
यापूर्वी, त्याने म्यानमारच्या पॉक सा याचे कडवे आव्हान 5-4 अशा निसटत्या फरकाने मोडीत काढत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते.