प्रतिनिधी/ कोल्हापूर
पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पंचगंगा जलसमाधी परिक्रमा यात्रेला आज सुरुवात झाली. सकाळी तीर्थक्षेत्र प्रयाग चिखली येथून जलसमाधी प्ररिक्रमेस राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. राजू शेट्टी यांची पंचगंगा जलसमाधी परिक्रमा यात्रा आंबेवाडी नजीक दाखल झाली आहे.