ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मजुरांसाठी सोडण्यात आलेल्या विशेष श्रमिक ट्रेनमध्ये तैनात असलेल्या पंजाबमधील रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या 14 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.
लॉकडाऊनदरम्यान देशभरातील विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना मूळ गावी पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष श्रमिक ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेडमधून पंजाबमध्ये आलेल्या ट्रेनमध्ये एक मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर अशा ट्रेनमध्ये तैनात असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या 14 जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता आरपीएफच्या जवनांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.