चंदीगड
आय लिग फुटबॉल स्पर्धेतील माजी विजेत्या पंजाब एफसी संघाच्या विंडो ट्रान्सफरवरील बंदी फिफाने उठविण्याचा निर्णय घेतला आहे. या संघातील नॉर्थ मॅसेडोनीयन फुटबॉलपटू डेनकोव्हेस्की याचे मानधन थकले होते. त्यांच्यावर थ्री विंडो ट्रान्स्फर बंदीची कारवाई करण्यात आली होती. फिफाने ही बंदी उठविल्याचे पत्र या संघाकडे पाठविले आहे.
आय लिग फुटबॉल स्पर्धेत यापूर्वी मिनर्व्हा एफसी म्हणून ओळखल्या जाणाऱया फुटबॉल क्लबच्या थ्री विंडो ट्रान्सफरवरील बंदी फिफाच्या वादग्रस्त तडजोड चेंबरने (डीआरसी) उठविण्याचा निर्णय घेतल्याचे लेखीपत्र 13 जुलै रोजी क्लबला पाठविण्यात आले. या निर्णयामुळे आता पूर्वाश्रमीच्या मिनर्व्हा एफसी तर सध्याच्या पंजाब एफसीला खेळाडूंचे ट्रान्स्फर करता येणार आहे.