रुद्रप्रयागच्या कोटतल्ला शाळेतील शिक्षकाचा पुढाकार
उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग जिल्हय़ातील कोटतल्ला या लहानशा गावात असलेली सरकारी शाळा ही राज्यभरातील सरकारी शाळांसाठी एक उदाहरण आहे. कमी पटसंख्येमुळे राज्यातील अनेक सरकारी प्राथमिक शाळा बंद पडत असताना या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या येथे 35 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या काळात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे डबघाईला आलेली असताना शाळेतील शिक्षक सत्येंद्र यांनी कोरोनाचे नियम पाळून गरीब विद्यार्थ्यांना घरपोच वहय़ा, वाचन व लेखन साहित्याचे वाटप केले. सत्येंद्र हे आपल्या पगाराच्या 10 टक्के रक्कम विद्यालयातील व्यवस्था वाढविण्यासाठी खर्च करतात.
जिल्हा मुख्यालय रुद्रप्रयागपासून 40 किमी अंतरावर धनपूर पट्टय़ातील जसोली परिसरात कोटतल्ला गाव आहे. येथील शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यापासून ते वाचनापर्यंत सर्व आधुनिक व्यवस्था उपलब्ध आहे. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र खुर्ची व टेबल आहे. याचबरोबर आठवडय़ातून एकदा मुलांना संगणकाचे शिक्षण दिले जाते. तसेच मुलांना इंग्रजी बोलायलाही शिकवले जाते. शाळेतील तिसरी ते पाचवी वर्गात शिकणारे विद्यार्थी इंग्रजीत बोलतात. हे सर्व शिक्षक सत्येंद्र भंडारी यांच्या प्रयत्नांमुळेच शक्मय झाले आहे.
कोरोना संक्रमणाच्या काळातही विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यास प्रवृत्त करण्यात आले. जिल्हय़ात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. त्याचवेळी कोटतल्ला गावातील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सतेंद्र यांनी कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर मुलांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचे कामही सुरूच होते. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत संगणक शिक्षण घेऊ इच्छिणाऱया मुलांना त्यांच्या नातेवाईकांच्या शिफारशीवरून शाळेत शिक्षण देण्यात आले. एवढेच नाही तर मुलांना पर्यावरणाकडे प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत वेळोवेळी वृक्षारोपणही केले जाते.