सुळे / वार्ताहर
धामणी खोऱ्यातील पणुत्रे (ता.पन्हाळा) येथील नदी काठच्या ऊस पिकास वीजतारांचे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने ऊस पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पणुत्रे येथील नदीकाठावरील जाईचा मळा नावाच्या शेतात आज विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ऊस पिकास आग लागली यात एकनाथ महादेव घोलपे, सर्जेराव बंडू पाटील,मारूती रामा पाटील, गणपती रामा पाटील, सर्जेराव रामा पाटील आदी शेतकऱ्यांयांच्या सुमारे अडीच एकर क्षेत्रातील उभे ऊस पिक जळाले असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.