परुळे /प्रतिनिधी-
पत्नीच्या निधनाच्या धक्क्याने अवघ्या 27 तासात पतीचे वृद्धापकाळाने निधन भोगवे गावचे माजी सरपंच व बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांचे कट्टर समर्थक समाजवादी विचारसरणीचे व त्यानंतर जनता दलाचे निष्ठावान कार्यकर्ते भोगवे गावचे विकास पुरुष राजाराम उर्फ भाऊ वामन सामंत (९३) राहत्या घरी मंगळवारी ६ जुलै रोजी रात्री ११ सुमारास पत्नीच्या निधनांच्या धक्क्याने त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
भोगवे ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली होती. आज पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या भोगवे गावात व किल्लेनिवती भागात रस्ता नेण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले होते. किल्लेनिवती भागात प्राथमिक शाळा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सरपंच पदाच्या कालावधीत भोगवे ग्रामपंचायतीची स्वतःच्या मालकीची इमारत त्यांनी बांधली होती. परुळे म्हापण पंचक्रोशीत पहिला पर्यटन व्यवसाय सागर दर्शन रिसॉर्ट सुरू करण्याचा मान त्यांनी मिळवला होता. ,आदिनारायण देवस्थान समिती सदस्य , भोगवे सहकारी सेवा संस्था सदस्य,विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.
सोमवारी त्यांच्या पत्नी सीताबाई राजाराम सामंत (८५) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले होते त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे भोगवे येथील पर्यटन व्यावसायिक व बागायतदार संजय सामंत व जगदीश सामंत यांचे ते वडील तर भोगवे ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर श्रद्धा सामंत यांचे आजोबा होत