ऑनलाईन टीम / मिंस्क :
सरकारविरोधी पत्रकाराच्या अटकेसाठी बेलारुसमध्ये प्रवाशी विमान हायजॅक करण्यात आल्याची घटना घडली. बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी रविवारी एका पत्रकाराला अटक करण्यासाठी लढाऊ विमाने पाठवून ग्रीसच्या अथेन्सहून लिथुआनीयाच्या विलिनीयस येथे जाण्यासाठी निघालेले रेयान एअरचे प्रवासी विमान हायजॅक केले. तसेच ते विमान मिंस्क विमानतळावर उतरवले आले.
हायजॅक केलेल्या या प्रवाशी विमानात 170 प्रवाशी होते. या प्रवाशांमधील रोमन प्रोटोसवीक (वय 26) या पत्रकाराला आणि त्याची रशियन मैत्रिण सोफिया सापेगा (वय 23) यांना अटक करण्यात आली आहे. रोमन प्रोटोसवीक हा पत्रकार नेहमीच सरकारविरोधी भाष्य करत राष्ट्रपतींवर टीका करत होता. त्याच्यावर देशात अशांतता पसविल्याचा तसेच गतवर्षी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लेकाशेंको विजयी झाल्यावर त्यांच्या विरोधात रस्त्यांवर विरोध प्रदर्शनाचे आयोजन केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.
बेलारुसी राष्ट्राध्यक्षांच्या कृत्याची जागतिक स्तरावर टीका होत आहे. युरोपियन युनियनने रोमन आणि त्याच्या मैत्रिणीची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही बेलारुच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत बेलारुसवर निर्बंध लादण्याच्या युरोपियन युनियनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.