वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताची महिला पॅरा बॅडमिंटनपटू पलक कोहली बॅडमिंटनच्या तीन विविध प्रकारात सहभागी होणार आहे. सदर पॅरा ऑलिंपिक स्पर्धा 24 ऑगस्टपासून सुरू होईल.
भारताची पॅरा महिला बॅडमिंटनपटू पलक कोहली टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन प्रकारात सहभागी होत आहे. कोहली एसएल 3-एसयु 5 मिश्र दुहेरीत खेळणार आहे. टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेसाठी बॅडमिंटनच्या सर्व तीन प्रकारात पात्र ठरणारी कोहली ही भारताची पहिली महिला पॅराबॅडमिंटनपटू आहे.