सहा जणांचा मृत्यू
श्रीनगर
पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात 135 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बंगालमध्ये कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 3197 वर पोहोचली असून, 193 लोक मृत्यू पावले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने सरकारच्या डोकेदुखीत वाढ होत आहे. दरम्यानच्या कालावधीत मृत झालेल्या 72 जणांचा कोरोनाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. कोरोना पॉझिटिव्ह असूनही, त्यांचा मृत्यू अन्य कारणाने झाल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. कोरोनामुळे शुक्रवारी बरे झालेल्या लोकांची संख्या 28 असून, आतापर्यंत 1221 लोकांनी कोरोनावर विजय प्राप्त केला आहे.