तालिबानचा नवा प्रताप
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर तालिबानचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तालिबान अब्जावधी रुपयांची अमेरिकेची संरक्षणसामग्री अन्य देशांना विकत आहे. विशेष म्हणजे यात पाकिस्तानचा समावेश आहे.
तालिबानकडून अफगणिस्तानमधून लाखो डॉलर्सच्या चोरण्यात आलेल्या अमेरिकेच्या सैन्याच्या हार्डवेअरची निर्यात केली जात आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अमेरिकेच्या सैन्यवाहनांची खरेदी करण्याची तयारी चालविली आहे.
अमेरेकच्या सैन्याचे हमवेस अणि अन्य चिलखती वाहनांना अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात नेले जात असल्याचे आढळून आले आहे. सैन्य ट्रक्सना पाकिस्तानच्या क्वेटा शहरात हलविले जात असल्याचे एका छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे. क्वेटा हे शहर तालिबानच्या नेतृत्वाचे मुख्यालय राहिले आहे.
तालिबानला आता अफगाण सैन्याकडील संरक्षण सामग्री मोठय़ा प्रमाणावर प्राप्त झाली आहे. ही सामग्री अमेरिकेने अफगाण सैन्याला पुरविली होती. या संरक्षणसामग्रीची तालिबान आता निर्यात करत आहे. पाकिस्तानातील क्वेटा शहर कंधारपासून 3 तासांच्या अंतरावर आहे. क्वेटा हे शहर दहशतवादी संघटना आणि अमली पदार्थांच्या आणि विशेषकरून हेरॉइनच्या तस्करीचे मोठे केंद्र आहे. क्वेटा शहरात यापूर्वीच तालिबानचे दहशतवादी आश्रय घेत राहिले आहेत. तालिबानच्या जखमी दहशतवाद्यांवरही तेथेच उपचार होत राहिले आहेत.
अमेरिकेने अफगाणिस्तानात अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्रs आणि उपकरणे सोडून दिली आहेत. याचा बहुतांश हिस्सा आता तालिबानला प्राप्त झाला आहे. तालिबानकडून पुरविण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा भारताविरोधात वापर होण्याचीही शक्यता आहे.