सांगली / प्रतिनिधी
बुधगाव ग्रामपंचायत मध्ये गेली महिना पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी बंद असल्यामुळे पाणीपुरवठा लवकर सुरू करावा ,यासाठी बुधगाव शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते गेले ,असता ग्राम विकास अधिकारी व सरपंच जाणीवपूर्वक गैरहजर होते .त्यांना वारंवार फोन करून सुद्धा नकार दिल्यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून ग्रामपंचायतला टाळे ठोकून शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील ,तालुका प्रमुख गजानन मोरे ,शहरप्रमुख सतिश खांबे ,रामदास पाटील ,अरविंद पाटील ,बटू पाटील ,सतिश मस्के ,सतिश हिवरे ,उत्तम कोळी ,सुनिल आवळे ,अजिंक्य इंगळे ,शहाजी पाटील ,उमेश क्षीरसागर ,अशोक पाटील, मोहन माने शिवाजी रसाळे व कार्यकर्ते उपस्थित होते.