प्रतिनिधी/ बेळगाव
114 वर्षे पूर्ण केलेली व या भागातील पहिली असलेली बेळगाव पायोनियर अर्बन को-ऑप. बँक प्रगतिपथावर असून या बँकेकडे गेल्या आर्थिक वर्षात 84 कोटींच्या ठेवी आहेत. 55 कोटींची कर्जे वितरित करण्यात आली आहेत. बँकेने 47 कोटींच्या गुंतवणुकीसह 83 लाख 55 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे, अशी माहिती चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी दिली.
बँकेची 114 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून सभासदांनी मोबाईलवरून व्हॉट्सऍप लिंकवरून सभेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बँकेचे भागभांडवल 1 कोटी 90 लाख रुपये, राखीव निधी 15 कोटी 39 लाख रुपये असून एकूण व्यवसाय 137 कोटी 76 लाखांचा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकेचे खेळते भांडवल 101 कोटी 55 लाख झाले आहे. गेल्या वषीच्या व्यवहारातून अ वर्ग सभासदांना 15 टक्के तर ब वर्ग सभासदांना 8 टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे. अनेक ज्ये÷ सभासदांना सभासद कल्याण निधीतून आर्थिक मदत देण्यात आली आहे. बँकेच्या मुख्य शाखेसह 4 शाखा कार्यरत असून खातेदारांच्या सोयीसाठी आधुनिक बँक प्रणाली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व बँकेचा पाठपुरावा करीत आहोत. लवकरच आम्ही या सर्व सोयी उपलब्ध करून देवू, असा विश्वासही प्रदीप अष्टेकर यांनी व्यक्त केला.