प्रतिनिधी / शिराळा
शिराळा तालुक्यातील शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचा तालुक्यातील पारधी समाजातील लोकांनी आज विशेष सत्कार केला. मांगले येथील चोरीचा छडा अवघ्या बारा तासात लावल्यामुळे खरा चोर सापडला .यामुळे पारधी समाजावर होणारी चौकशी टळली. म्हणून पारधी समाजातील लोकांनी आज पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचा सत्कार केला
मांगले (ता. शिराळा) येथील डॉ बी . एन . पाटील यांच्या गंधा नर्सिंग होम दवाखान्यात अज्ञाताने २९ तोळे सोने , दहा भार चांदी व रोख ५० हजार असा मुद्देमाल लंपास केला होता.
पारधी समाजाला महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. समाजातील लोक फार शिकलेले नाहीत. आजही गावोगावी मागूनच त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागतो. पिढ्यानपिढ्या चोरी करणारा, फसवणारा, लूटमार करणारे ; म्हणून त्यांच्यावर शिक्का पडला आहे . समाजाच्या मूळ प्रवाहात याला अजूनही त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. कोणत्याही गावात चोरी झाली तर पहिल्यांदा पारधी लोकांना टार्गेट केलं जातं. मांगले येथे झालेल्या चोरीनंतर ही पारधी समाजातील लोकांना ताकीद देण्यात आली होती. मात्र बारा तासातच मूळ चोर सापडल्याने चौकशीतून पारधी समाजाची सुटका झाली. त्यामुळे आज शिराळा येथे येऊन पारधी समाजातील लोकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचा विशेष सत्कार केला.
यामुळे पोलीस स्टेशन परिसरात आज वेगळेच वातावरण होते .नेहमी चोरीच्या गुन्ह्यात पकडून पोलीस स्टेशनमध्ये पारधी लोकांना आणले जाते. सातत्याने पोलीस स्टेशननशी नत्यांचा संबंध येतो. पण आज सत्काराच्या निमित्ताने पारधी लोक येथे जमले होते. हे दृश्यच मुळात बदलत्या परिस्थितीचे सूचक आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला आहे . शिकण्याचा हक्क दिला आहे. पण हे करत असताना सामाजिक रचना, आर्थिक विषमता यामुळे अनेक समाज घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी बराच काळ लागला आहे .अजूनही पारधी समाज गावकुसाबाहेर आहे. त्यांना स्वतंत्रपणे राहण्यासाठी घरे नाहीत. त्यांच्या मुले अजून कोणती शिक्षण अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. पिढ्यानपिढ्या चोरी करूनच जगतात. यातून पुढच्या पिढिची तरी सुटका व्हावी. आजच्या घटनेतून एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न पारधी समाजाने केला आहे. त्यांना पण शिकायचे आहे. त्यांनाही इतरांसारखे जगायचं आहे. गरज आहे फक्त त्यांना आपल्यात सामावून घेण्याची