ऑनलाईन टीम / नगर :
अहमदनगरमधील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिह्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप ऐकली आणि मन सुन्न झाले, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे… देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचे काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱयांकडून होतयं का तेच आता पहायचे आहे, अशा शब्दात राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. वरि÷ांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिले आहे आणि त्यांनी म्हटलेय की मी ही तुझ्याकडे लवकरच येते आहे. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचे दाहक वास्तव त्यांनी उभे केले आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हिच माझी सुसाईड नोट समजा असेही त्यांनी त्या पत्रात म्हटलंय. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळय़ांची नावे लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पढे त्या म्हणाल्या, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. मॉ साहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळे होत आहे. सत्तेच्या या बेलगाम घोडय़ांना वेळीच वेसण घालणं गरजेचे आहे. देवमाणूस म्हणून वापरणाऱया पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता पाहायचे आहे. नाहीतरी या महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे? असा संतप्त सवालही चित्रा वाघ उपस्थित केला आहे.