जिल्हा रुग्णालयासमोरील जागेतील पार्किंग शुल्क वसुली स्थगित ठेवण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या पार्किंग शुल्क आकारणी निविदेला थंडा प्रतिसाद लाभल्याने आता नव्याने चार निविदा काढण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने चालविला आहे. पण सध्या महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी पार्किंग शुल्क आकारणी करण्यात येते. त्यामुळे पार्किंग शुल्क रक्कमेपेक्षा कर्मचाऱयांचे वेतन अधिक होत आहे. त्यामुळे कर्मचाऱयांकरवी वसूल करण्यात येणारी पार्किंग शुल्क आकारणी स्थगित ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. बापट गल्ली, जिल्हा रुग्णालय, आर. एल. एस. कॉलेज आणि खंजर गल्ली अशा चार ठिकाणी खुल्या जागेत पार्क करण्यात येणाऱया वाहनांकडून पार्किंग शुल्क आकारण्याकरिता मनपाने निविदा काढल्या होत्या. सध्या बापट गल्ली आणि जिल्हा रुग्णालयासमोरील खुल्या जागेत पार्क करण्यात येणाऱया वाहनधारकांकडून मनपाचे कर्मचारी पार्किंग शुल्क घेतात. अन्य दोन ठिकाणी नव्याने शुल्क आकारणी करण्यात येणार होती. पण निविदा प्रक्रियेला कोणताच प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे पार्किंग शुल्क महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी वसूल करण्यात येते. दोन्ही ठिकाणी मनपाचे कर्मचारी अडकून पडत आहेत. त्यांचे वेतन आणि वसूल होणारी रक्कम पाहता पार्किंग शुल्कपेक्षा कामगारांचा पगार जास्त होत आहे. परिणामी मनपाला नुकसान होत आहे. दोन्ही ठिकाणी मनपाचे कामगार अडकून राहत असल्याने अन्य कामे रखडत आहेत. अशातच मिळणारा पार्किंग शुल्कदेखील कमी असल्याने महसूल विभागाला नुकसान सोसावे लागते. त्यामुळे चार वेगवेगळय़ा निविदा काढून पार्किंग शुल्क आकारणीचे काम देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पण सध्या नुकसानीत पार्किंग शुल्क वसुली करावी लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱयांकरवी शुल्क वसूल करण्याचे बंद करण्याचा विचार मनपा प्रशासनाने चालविला आहे. पण बापट गल्ली येथे वाहनांची गर्दी जास्त असल्याने अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क करीत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचप्रमाणे वाहनधारकांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी कर्मचाऱयांकरवी पार्किंग शुल्क वसुली सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयासमोर कोणतीही अडचण निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी पार्किंग शुल्क आकारणी वसुली स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने निविदा काढल्यानंतर कंत्राटदाराकरवी पार्किंग शुल्क वसुली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.