नवी दिल्ली
कोव्हिड 19 विरुद्धच्या लढय़ासाठी अनेक क्रीडापटूंनी देणगी दिली असून त्यात आता बॅडमिंटनपटू पी. कश्यपची भर पडली आहे. त्याने तेलंगणा मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये 3 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
33 वर्षीय कश्यपने या लढय़ात सहभागी होऊन अविरत कार्य करणाऱया डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी या सर्वांचेही आभार मानले आहेत. या संदर्भात त्याने ट्विट करून माहिती दिली. पीएम केअर्स फंडाची स्थापना केल्यानंतर अनेक उद्योगपती, कलावंत, क्रीडापटू व इतरांनी भरीव देणगी देत या लढय़ाला साहय़ केले असून दिवसेंदिवस देणगीदारांची संख्याही वाढत चालली आहे. 6 एप्रिल रोजी माजी हॉकीपटू धनराज पिल्लेने या निधीस 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे.