चेन्नई / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुढील आयपीएल हंगाम (2022) आपल्यासाठी शेवटचा असेल, असे जाहीर केले. चेपॉकवर घरच्या मैदानावर निरोपाचा सामना खेळण्याचा आपला मानस असेल, असे धोनी याप्रसंगी म्हणाला. पुढील हंगामात चेन्नई सुपरकिंग्स व्यवस्थापन कर्णधार धोनी, अष्टपैलू रविंद्र जडेजा व धडाकेबाज सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना संघात कायम राखण्याचे संकेत आहेत. धोनी 2019 पासून चेन्नईत एकही आयपीएल सामना खेळू शकलेला नाही. यापूर्वी, 2020 मधील आयपीएल आवृत्ती संयुक्त अरब अमिरातमध्ये झाली तर यंदा पहिल्या टप्प्यात चेन्नई सुपरकिंग्सचे सर्व सामने मुंबईत खेळवले गेले होते