ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पुढील तीन ते चार महिन्यात लोकांसाठी कोरोनावरील लस उपलब्ध होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन म्हणाले, नवीन वर्षात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यात लोकांसाठी कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जुलै-ऑगस्टपर्यंत जवळपास 25 ते 30 कोटी नागरिकांना लस देण्याची सरकारची योजना आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
तसेच दिल्लीतील बुरारी येथील समागम मैदानावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी कोरोना नियमावलीचे पालन करण्यास सांगितले आहे.