ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये मागील 24 तासात 457 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 35 हजार 616 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 547 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,35,616 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 28 हजार 798 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.11 % आहे. तर आतापर्यंत 1, 263 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 5,553 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 46 लाख 64 हजार 431 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 553 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.