बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना संख्या वाढत असताना पुढील दहा दिवस निर्णायक ठरतील असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिल्यानंतर बृह बेंगळूर महानगरा पालिकेने लसीकरण वाढविण्यासाठी, चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि सरकारी व खाजगी आरोग्य सेवांच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. बीबीएमपी आयुक्त गौरव गुप्ता यांनी कोविड-संक्रमित लोकांसाठी पुढील दहा दिवसांत किमान ६ हजार बेड आरक्षित करण्याच्या उपाययोजना केल्या जातील, असे म्हंटले आहे.
दरम्यान प्रशासन कोरोना रूग्णांसाठी एकूण बेडपैकी ५० टक्के बेड राखीव ठेवण्यासाठी, तसेच खासगी सुविधांबाबद योग्य तपासणी करेल. खाजगी आरोग्य सुविधा सार्वजनिक आणि खाजगी कोटा अंतर्गत उपलब्ध बेड संख्या जनतेच्या फायद्यासाठी प्रदर्शित करणे आवश्यक आहे.