ऑनलाइन टीम / पुणे :
पुणे विभागातील 9 हजार 778कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 563 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 83 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.83 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुढे ते म्हणले की, यापैकी पुणे जिल्हयातील 12 हजार 147 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 619 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 27 आहे. कोरोनाबाधित एकूण 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.12 टक्के इतके आहे.
तसेच आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 18 हजार 411 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 15 हजार 842 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 569 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 15 हजार 563 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.