ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागात आतापर्यंत 3321 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 823 वर पोहचली आहे. सध्या 3178 ॲक्टीव्ह रुग्ण असून, 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 210 रूग्णांची प्रकृृृती चिंताजनक असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
म्हैसेकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात 5 हजार 616 बाधित रुग्ण असून, 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 2 हजार 444 आहे. तर 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204 रुग्ण गंभीर असून, उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. शनिवारच्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 336 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 249, सातारा जिल्ह्यात 37, सोलापूर जिल्ह्यात 22, सांगली जिल्ह्यात 3 तर कोल्हापूर जिल्ह्यात 25 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात 278 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 157 आहे. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 570 रुग्ण असून 249 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 275 असून, 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 73 कोरोनाचे रुग्ण असून 40 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 31 आहे. 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 286 रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 271 आहे. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकूण 71 हजार 111 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 62 हजार 159 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 966 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 55 हजार 253 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 823 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.