ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 60 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 98 हजार 657 झाली आहे. तर सद्यस्थितीत 35 हजार 885 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 982 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.91 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, यापैकी पुणे जिल्हयातील 79 हजार 99 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 50 हजार 573 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 26, 656 आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 290 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 331, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 56 , पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 39 , व ग्रामीण क्षेत्रातील 123 , रुग्णांचा समावेश आहे. तसेच 738 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 84 हजार 272 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 78 हजार 282 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 950 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 78 हजार 800 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.