ऑनलाईन टीम / श्रीनगर
काश्मीरच्या सौंदर्याने नेहमीच भारतासह संपुर्ण जगाला भुरळ घातली आहे. यामुळे गेले काही वर्षे काश्मीरकडे पर्यटकांनी काहीशी पाठ फिरवली असली तरी काश्मिरकडे सद्या पर्यटक वळत असुन काश्मिरच्या सौंदर्याचा पर्यटनातुन आनंद घेत आहेत. याच पर्यटकांनसाठी महत्त्वाची बातमी असुन पृथ्वीवरील स्वर्ग अर्थात श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन खुले होणार असुन यामुळे २० मार्चपासून पर्यटकांना ट्युलिप उद्यानात सुमारे १५ लाख ट्युलिपची फुले पाहता येतील. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी तब्बल २.२५ लाख पर्यटकांनी येथे भेट दिली होती. यंदा ही संख्या जास्त असेल, असे उद्यानाच्या प्रशासनाने सांगितले.
श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन 30 एक उद्यान क्षेत्र असुन यामध्ये सुमारे १५ लाख ट्युलिपची फुले पाहता येतात व ५५ प्रजातीं ही पाहता येतात येणार आहे. ३० दल सरोवराचा परिसर व जबरवनच्या तळाशी ट्युलिप उद्यानाचे ३० एकर क्षेत्र दिसते. सोनमार्गमध्ये १२.५ एकरमध्ये आणखी एक ट्युलिप उद्यान साकारले जात आहे. हे गार्डन आशियातील सर्वात मोठे गार्डन म्हणुन ही ओळखले जाते.
मुघल गार्डन ही पर्यटकांना खुणावते आहे
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर ही मुघलांची पहिली पसंती होती. त्यांनी या शहराला एक अतिशय सुंदर जागा भेट दिली आणि ती म्हणजे ‘मुघल गार्डन’. हे सम्राट जहांगीरने १६१९ मध्ये बांधले होते. सुमारे 400 वर्षे उलटून गेल्यानंतरही शालिमार बागेच्या पायर्या आणि त्यांच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या फ्लॉवर बेड पर्यटकांना आकर्षित करतात. दल सरोवर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर तलाव आहे. जर तुम्ही सुट्टीसाठी काश्मीरला जात असाल तर तुमचा पहिला प्रयत्न दल लेक फिरण्याचा असावा. काळजी करू नका, दल सरोवरावरील ही तरंगणारी हॉटेल्स तुमच्या बजेटवर जास्त ताण आणणार नाहीत. तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी देखील बुक करू शकता.