आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविला द्वितीय क्रमांक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचा युवक पृथ्वी निरलगीमठ याने लिहिलेल्या निबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. ‘व्हॉट इज लाईफ इन द यूथ कॅटेगरी’ हा निबंधाचा विषय होता. गोय पीस फौंडेशन जपानतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या यशामुळे आयोजकांतर्फे 31 ऑक्टोबर रोजी होणाऱया विजेत्यांच्या मेळाव्याला त्याला निमंत्रित करण्यात आले आहे.
या स्पर्धेत पृथ्वीने दुसरा क्रमांक मिळविला असून त्याला 50 हजार येन (जपानी चलन) इतकी रक्कम बक्षिसापोटी जाहीर झाली आहे. पृथ्वी हा लिंगराज कॉलेजमध्ये बीएच्या अंतिम वर्षात शिकत आहे. यापूर्वी कॉमनवेल्थ आयोजित स्पर्धेत त्याने ब्रॉन्झ पदक मिळविले होते.
आयएफआयएम लॉ स्कूल आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत तसेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने घेतलेल्या आणि एसजीआय नॅशनल वाद विवाद स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्यस्तरावर झालेल्या युवा संसदेमध्ये त्याने गृहमंत्री म्हणून प्रतिनिधीत्व केले. येथील विजया आणि विरुपाक्षी निरलगीमठ यांचा तो सुपूत्र आहे.