गुवाहाटी
आसामच्या भाजप सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर 5 रुपये प्रतिलिटर तर दारूचे भाव 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या चेहऱयावर आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने गेल्या वषी कोरोना संकटाच्या दरम्यान पेट्रोल डिझेलवर 5 रुपये प्रतिलिटर सेस टॅक्स लावला होता. जो आता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने दारूचे दर 25 टक्क्मयांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे. येत्या एप्रिल महिन्यात आसामसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. आसाममध्ये सध्या भाजपचे सरकार असून येणारी निवडणूक अत्यंत आव्हानात्मक मानली जात आहे. राज्यात 12 विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वात युतीची स्थापना केल्यामुळे तेथे भाजपची चुरशीची लढत होऊ शकते. त्यामुळेच आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपने लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे.