बोगस पास घेऊन येणाऱया महाराष्ट्रातील गाडय़ांवर कारवाई कराः कळंगुटकर
प्रतिनिधी / पेडणे
पेडणे ट्रक मालक संघटनेतर्फे पुकारलेल्या आंदोलनाला काल सहा दिवस पूर्ण झाले. मात्र सरकारने याकडे अजूनही याकडे लक्ष दिले नाही. सहाव्या दिवशी संपूर्ण पेडणे तालुक्मयात येणाऱया मालवाहू ट्रकना संपूर्ण दिवसभर वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन केले होते, त्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळ जवळ संपूर्ण माल वाहतूक काल बंद होती. माल वाहतूक करणाऱया वाहनांच्या मालकांनी आपल्या गाडय़ा बंद ठेऊन ट्रक मालकांना आपला पाठिंबा जाहीर केला. संध्याकाळी गोवा फॉरवर्डचे मांदे मतदारसंघाचे नेते दीपक कळंगुटकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला .
मोपा विमानतळ प्रकल्पात जे खडी, रेती आणि चिरे लागतात त्याची वाहतूक करण्यासाठी आम्हाला वाढीव दर देवून आमच्या ट्रकाना कामधंदा द्यावा आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आम्ही आमच्या गाडय़ा रस्त्यावर उभ्या ठेवून सरकारचा निषेध करू. आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा सहाव्या दिवशी पोरस्कडे पेडणे येथे ट्रक मालक व्यावसायिक संघटना पेडणेमार्फत करण्यात आला.
या आंदोलनाला अनेक राजकीय व्यक्तींनी त्या ठिकाणी येऊन पाठिंबा जाहीर केला. पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर, समाजसेविका मोनालीच्या रोच्या अशा अनेकांनी आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना माजी आमदार परशुराम कोटकर म्हणाले की, गोव्यात लोकशाही सरकार अस्तित्वात नाही जर असते तर गोव्यात जी आंदोलने होतात ती झाली नसती. ज्याप्रमाणे भाजप सरकार राज्य चालवत आहे ते बघितल्यास असे वाटते त्यांना स्थानिक लोकांचे काही पडलेच नाही.
समाजसेविका मोनालीच्या रोच्या यांनी सांगितले की , भाजप सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? गेले सहा दिवस पेडणेत आंदोलन चालू आहे. त्यांच्या मुलाबाळांचे कसे चालत आहे, काय खातात याकडे सरकारचे लक्ष नाही, साधी विचारपूस केली नाही ही खेदाची बाब आहे.
संध्याकाळी मांदे मतदारसंघाचे गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांनी आंदोलन करणाऱया ट्रक मालकांची भेट घेऊन आपला पाठिंबा त्यांना दिला. यावेळी पञकाराकडे बोलताना ते म्हणाले, जर स्थानिक लोकप्रतिनिधी असता तर त्यांनी हा विषय,पोटतिडकीने सोडविला असता.
सरकारी यंञणा स्थानिक आणि पेडणेतील व्यावसायिकाना नियम आणि कायदे सांगते माञ शेजारच्या महाराष्ट् राज्यातून बोगस पास घेऊन माल भरुन ट्रक येतात त्यावर कारवाई होता नसून त्यावर सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.